कुटूंब म्हणले कि भाडणं आलेच,आणि ज्या संसारात पती-पत्नी एकमेकांशी भांडत नाहीत त्या संसारात काहीतरी उणीव आहे असे म्हटले जाते.संसार कितीही प्रेमाचा असला तरी भांड्याला भांडे लागण्याचे निमित्तही भांडण सुरु होण्यास कारणीभूत ठरते असे म्हटले जाते.भांडण झाले कि मग आदळआपट आली,रुसवा आला,पतिराजाच्या जेवणाची आबाळ आली आणि नंतर गोड समझोताही आलाच.पण एखादया वेळी किरकोळ कारणावरून सुरु झालेले भांडण विकोपाला जाते.
असाच प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला असून माहेरी जाण्याचा हट्ट करीत असलेल्या पत्नीला पतीने नंतर जा असे सांगत पती झोपी गेला.आणि रात्री १२ वाजता त्याला जाग आली ती बायकोने डोक्यात क्रिकेटच्या बॅटने प्रहार केल्यानंतरच.बायकोने बॅटचे आणखी दोनचार फटके लागवल्यानंतर आरडा ओरडा ऐकून घर गोळा झाले आणि पतिराजाची सुटका झाली.
या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात सदर पतीने आपल्या पत्नी विरोधात फिर्याद दिली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…