सध्या पंढरपूर ग्रामीण मध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मा.जिल्हाधिकारी,सोलापूर यांनी दि.१३ ऑगस्ट, २०२१ पासून पंढरपूर तालुक्यामध्ये (लॉकडाऊन) संचारबंदी लावण्याची तयारी दर्शविलेली आहे.
याबाबत भगिरथदादा भालके यांनी आज दि.११.०८.२०२१ रोजी मुंबई येथे ना. जयंतराव पाटीलयांची समक्ष भेट घेऊन पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत सविस्तर चर्चा करून तसे लेखी पत्रही दिले.
त्यावर ना. जयंतराव पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांना त्वरीत फोन करून सूचना दिल्या की, पंढरपूर शहरात संचारबंदीसाठी तीव्र विरोध असेल तर पंढरपूर शहरातील सर्व लहान-मोठे व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक, सर्व पदाधिकारी यांचे समवेत त्वरीत मिटिंग घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून मगच संचारबंदी (लॉकडाऊन) चा तोडगा काढावा, जेणे करून व्यापारी व नागरिकांवर अन्याय होणार नाही.
सदर मंत्री महोदयांनी त्वरीत मा.जिल्हाधिकारी,सोलापूर यांना फोनवरून दिलेल्या सूचनांमुळे पंढरपूरातील व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ज्याप्रमाणे आमदार स्व.भारतनाना हे नेहमीच पंढरपूर वासीयांच्या सोबत राहिले त्यांच्या नंतर मीही कायमच आपल्या सोबत राहिन. त्यामुळे व्यापाऱ्यांवर व इतर नागरिकांवर अन्याय होणार नाही असा विश्वासही श्री विठठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके यांनी दिला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…