ताज्याघडामोडी

क्ररतेचा कळस ; दारू पिण्यापासून अडवले

जालनाः जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी येथे पोटच्या मुलानं जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. तर, सातऱ्यातही किरकोळ कारणावरुन स्वतःच्याच आईचा खून केल्याची घटना घडली आहे.

दारू पिण्यासाठी पैसै शिल्लक नसल्यानं घरातील गहू, तांदूळ विकायचे आणि दारू प्यायची यासाठी सखाराम शिंदे हा तरूण सकाळी गहू तांदूळ घेऊन निघाला होता. तेवढ्यातच आईने गहू- तांदूळ नेऊ नकोस आपल्याला घरी खाण्यासाठी काहीच उरणार नाही, असा आरडाओरडा चालू केला. आईनं अडवल्याचा राग मनात धरुन आरोपीनं वेळूच्या काठीने आईला मारण्यास सुरुवात केली.

या मारहाणीत त्या मातेच्या डोक्यात मार लागल्याने शेजारील लोकांनी त्यांना आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. आरोपीच्या वडीलांनी आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली त्यानुसार आरोपी सखाराम शिंदे यांच्या विरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago