गुन्हे विश्व

भेटणार तेथे ठोकणार,कुठेपण असू दे,असे स्टेटस ठेवले

सोशल मीडियावर सूर्य उगवायचे आत तुला संपवतो असे स्टेटस संतोष जाधवने ठेवले होते. तर ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याने त्याच्या सोशल मीडियावर त्यास प्रत्युत्तर म्हणून संतोष जाधव भेटणार तेथे ठोकणार,

कुठेपण असू दे, तू असे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन अज्ञातांनी एकलहरे गावाच्या हद्दीत सुलतानपूर रस्त्यावर मोटारसायकलवरून येऊन मंचर (ता. आंबेगाव) सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेलेवर रविवारी (दि. 1) भरदुपारी गोळीबार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्यातील नऊ आरोपींपैकी सात जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना शनिवार (दि.7) पर्यंत घोडेगाव न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

चेतन सत्यवान गायकवाड (वय 19, रा. नारायणगाव, ता. जुन्नर), राम सुरेश जाधव (वय 22, रा. आंबेठाण, ता. खेड), सौरभ कैलास पोखरकर (वय 19), लुट्या ऊर्फ तुषार नितीन मोरडे (दोघे रा. मंचर), आकाश संतोष खैरे

(वय 20, रा. वारुळवाडी, ता. जुन्नर) यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संतोष सुनील जाधव (रा. पोखरी), पवन सुधीर थोरात (रा. मंचर) हे फरार आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

6 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago