पंढरपूर पोलीस उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या चारही पोलीस हद्दीतील भीमा नदीकाठच्या गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाच वाळू चोरी मात्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर तालुक्यातील विविध गावात आतापर्यत अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलिसांनी केलेल्या दिसून येतात.काही गावाच्या हद्दीत तर अवैध वाळू उपशावर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असताना तेथील तलाठी,मंडल अधिकारी,पोलीस पाटील याना त्याची भनक देखील कशी काय लागत नाही हे एक गौडबंगालच आहे.आज पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मुंढेवाडी तालुका पंढरपुर येथे केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या बिगर नंबरच्या पीकअप सह वाळू ताब्यात घेत दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात पो.कॉ.बालाजी कदम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीसह पो.ना. चवरे,पो.ना.क्षिरसागर हे तारापूर बिट मध्ये अवैध्य वाळू उपसा केसेस करणेकामी पेट्रोलिंग करित असताना मुंढेवाडी ता.पंढरपूर येथून भीमा नदी पात्रामधून अवैधरित्या वाळुचा उपसा करुन पिक अप मध्ये त्याचे मागिल टपामध्ये वाळू भरून अजनसोंड ता.पंढरपुर येथून गावातून वाळु चोरुन घेवुन पुढे जात आहे अशी माहिती मिळाली.हे पोलीस कर्मचारी अजनसोंड पाटी येथे आले असता समोरून एक पिक अप येत असताना दिसला दर पिकअपच्या पाठीमागील हौदामध्ये जावून पाहिले असता त्यामध्ये अर्धा ब्रास वाळू आढळून आली.
या प्रकरणी पिकअप चालक मालक नामे 1) उमेश विठ्ठल मोरे 2) दादा दगडू मोरे वय-31 वर्ष रा.मुंढेवाडी ता.पंढरपूर यांनी आपसात संगनमत करुन मौजे मुंढेवाडी ता.पंढरपूर यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम379,34सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…