ताज्याघडामोडी

आषाढ पौर्णिमा निमीत्त पंढरीतील बुद्धभूमीवर “धम्मचक्क पवत्तन सुत्त” पठण

तथागत गौतम बुद्ध यांनी आपल्या ज्ञानप्राप्ती नंतर पंच वर्गीय भिक्खूंना जो प्रथम उपदेश सारनाथ येथे केला होता तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमा. या  दिनाचे  औचित्य साधून तथागतांचा हा धम्मोपदेश जो धम्मचक्क पवत्तन सूत्त म्हणून प्रसिद्ध आहे या सुताचे पठण आज पंढरी नगरीतील बुद्धभूमीवर संपन्न झाले.  बौद्ध परंपरेतून आलेल्या वर्षावास संकल्पनेचा अंगीकार करीत वारकरी संप्रदाय चातुर्मास परंपरेद्वारे पंचशील पालन करीत पुढे नेत आहे.  बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरीत बुद्ध वचनांचा संदेश जनमानसांत पोहाचवावा या उद्देशाने  सम्यक क्रांती मंच ने धम्मचक्क पवत्तन सुत्त पठण तथा श्रवण हा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, माजी उपनगराध्यक्ष सुनील सर्वगोड, सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, सहसचिव स्वप्निल गायकवाड, खजिनदार रवींद्र शेवडे, बसपा जिल्हा महासचिव रवी सर्वगोड, ज्ञानेश्वर वाघमारे, निलेश सोनवणे, प्रवीण माने, कृष्णा लिहिने, रामचंद्र सरवदे, धम्म मित्र प्रभाकर सरवदे इत्यादी उपस्थित होते
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago