Categories: Uncategorized

उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम ए. शिक्षणशास्त्र आणि शालेय व्यवस्थापन पदविका ( डी. एस. एम)  या अभ्यासक्रमाची 2021 ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सदर अभ्यासक्रम दुरुस्थ शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून राबविले जातात त्यासाठी ऑनलाईन प्रवेशासाठी https://ycmou.digitaluniversity.ac/  ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
   सदर अभ्यासक्रमातील एम ए. शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम एम. एड. या अभ्यासक्रमासाठी समकक्ष असून वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरला जातो आणि शालेय व्यवस्थापन पदविका हा अभ्यासक्रम मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे यासाठी उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आवश्यक ती सर्व सविस्तर माहिती व मार्गदर्शन महाविद्यालयात उपलब्ध करून दिले जात आहे. एम ए. शिक्षणशास्त्र आणि शालेय व्यवस्थापन पदविका या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत  31 जुलै 2021 आहे. आपला प्रवेश गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयात करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापकांनी तात्काळ महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह, प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक सर, संकुलाचे जनसंपर्क अधिकारी श्री.  सूर्यकांत पारखे सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्युलता पांढरे व प्रवेश समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

2 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

6 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago