गावात आपलीच हवा असावी एखादी हिरोईन टाईप गर्लफ्रेंड असावी अशी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनाही संख्या आपल्यात काही कमी नाही.कुणी स्पर्धा परीक्षांत यश मिळवून,सैनिक अथवा पोलीस भरती होऊन,विविध शालेय अथवा महाविद्यलयीन परीक्षांमध्ये यश मिळवून गावात नावलौकिक मिळवतात,शाश्वत हवा करतात.मात्र काही तरुण चित्रपटाप्रमाणेच जीवन असते असा समज करून घेत गुन्हेगारी वृत्तीचा अवलंब करत हवा करायला जातात,काही काळ आपल्या परिसरात हवाही करतात खमक्या पोलीस अधिकारी किंवा विरोधक भेटला कि थेट पायाशी लोळण घेत कुठल्यातरी दुकानात नोकरी पत्करतात किंवा छोट्या मोठ्या धंद्याला लागतात.
मुळशी पॅटर्न हा बहुचर्चित मराठी सिनेमा पाहून अनेकांना राहुल्या होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत मात्र शेवटी राहुल्याला देखील कुणीतरी पळवू पळवून तोडते हे ते विसरून गेले आहेत.अशा राहुल्याचा आदर्श घेत मुळशी पॅटर्न टाईप स्टेट्स ठेवून हवा करू पाहणाऱ्या एका तरुणांच्या टोळक्याला कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी पोलिसांनी असाच हिसका दाखवला असून कबनूर गावातल्या काही तरुणांनी मुळशी पॅटर्न स्टाईल मारत हातात बंदुक घेत डायलॉग असलेला स्टेट्स ठेवला,याला लाईक भरपूर आल्या पण हेच स्टेट्स पोलिसांच्या बघण्यात आलं आणि त्यांना थेट लॉकअपची हवा खावी लागली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…