पंढरपूर शहरातील रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी वावरताना जागोजागी मोकाट गाईगुरांचे कळप आणि भटक्या कुत्र्यांचे टोळके हि नित्याची बाब ठरली आहे.पंढरपूर शहरातील अनेक गर्दीचे प्रमुख रस्ते,चौक आदी ठिकाणी जसे गुरांचे कळप हक्काने ठिय्या मांडून बसलेले दिसतात तसेच भटक्या कुत्र्यांचे कळपही हिंडताना दिसून येतात.याचा नागिरकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने नगर पालिकेकडून वेळोवेळी मोकाट जनावरे पकडण्यासाठी व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लाखो रुपये खर्च अपेक्षित असलेल्या निविदा काढते.मात्र ना मोकाट जनावरांचा नागिरकांना होणारा त्रास कमी होतो ना भटक्या कुत्र्यांचा वावर कमी होतो.रात्रीच्या वेळी तर पायी अथवा दुचाकीवरून जाणाऱ्या नागिरकांना या भटक्या कुत्र्यांच्या पाठलागाचा थरार अनुभवास येतो आणि अनेकांना धूम स्टाइलने दुचाकी पळवावी लागताना दिसून येते.
आता पंढरपूरकरांची भटक्या कुत्र्यांपासून सुटका करण्यासाठी पंढरपूर नगर पालिकेने १० लाख रुपये खर्चाची तयारी दर्शविली असून यासाठी नेहमी प्रमाणे निविदाही आमंत्रित केल्या आलेल्या आहेत.हि निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतरच लवकरच ठेकेदार नियुक्त होईल आणि शहरातील भटक्या कुत्र्यांचा वावर कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…