आषाढी एकादशी सोहळ्यात विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी नाहीच !

महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढपुरातील आषाढी यात्रा सोहळ्यावर अनेक निर्बंध लादले आहेत.देहू आळंदी आदी ठिकाणाहून पंढपुरकडे एकादशी सोहळ्यासाठी प्रस्थान करणाऱ्या मनाच्या प्रमुख १० दिंडी सोहळ्यांना ४० भाविकांसह पंढरपूरकडे पायी दिंडी नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती.या मागणीसाठी प्रशासन आणि दिंडी चालक यांच्यात अनेकवेळा बैठक झाली पण प्रशासन माघार घेण्यास तयार नव्हते.तर वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू हभप बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांना काही काळ स्थानबद्ध करण्यात आले होते.या घटनाक्रमानंतरही प्रशासन ठाम राहिले आणि आज अखेर एसटी बसने पालखी दिंडी सोहळे वाखरी मुक्कामी दाखल झाले.मात्र महाराष्ट्र सरकारच्या या आदेशा विरोधात संत नामदेव संस्थानने सुप्रीम कोर्टात दाद मागत महत्वाचे समजले जाणारे पालखी दिंडी सोहळे पायी पंढपुरात जाण्यास परवानगी द्या व आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
    त्याची सुनावणी आज पार पडली असून सरन्यायाधीश एन.व्ही. रमना, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने हि याचिका फेटाळून लावताना देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाची सद्य स्थिती लक्षात घेता आपण या बाबत याचिका कर्त्याची मागणी मान्य करणारा निर्णय देण्याबाबत असमर्थतता दर्शविली आहे.त्यामुळे हा वाद आता न्यायालयीन पातळीवर तरी निकालात निघाला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago