शासकीय योजनेनुसार अंगणवाड्यांना देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनचे 5 लाख 64 हजार रुपयांचे बिल अदा करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागणारा परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके याला उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून एकच वर्षांपूर्वी नोकरीत रुजू झालेल्या या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची लाच मागितली जाते यावरून शासकीय सेवेतील लाचखोर प्रवृत्ती किती निर्ढावली आहे हेच दिसून येते.
लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडीत, पोलीस उप अधीक्षक प्रशांत सापते यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा खासगी व्यक्ती शासकीय काम करून घेण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तक्रार देण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…