Categories: Uncategorized

पत्नी आणि मुलीनेच गुंडास सुपारी देऊन केला पोलीस हवालदाराचा खून

गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव कधी कुठे आणि कुणाच्या कुटूंबात कुठल्या करणाने होईल याची आता शाश्वती राहिली नाही.एकीकडे आपला जीव धोक्यात घालून पोलीस दलातील अनेक प्रामाणिक कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असलेले दिसून येतात तर त्याच वेळी राज्यात काही पोलीस ठाण्यात थेट गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक देत त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो अशा घटना घडताना दिसून येतात.तर काही गुन्ह्यामध्ये थेट पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग वेळावेळी आढळून आला आहे.
  आता भामरागड तालुक्यातील पोलीस दलात अशीच एक घटना घडली आहे.येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम 53 यांची 4 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास नागेपल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.या हत्याकांडाचा उलगडा पोलीस चौकशीवरून झाला असून पोलीस हवालदार सिडाम यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी व मुलीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सुपारी किलरद्वारे सिडाम यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलीसांनी मृतकाची पत्नी, मुलगी आणि एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी दोन आरोपीचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती प्रकरणाचे तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांनी दिली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago