ताज्याघडामोडी

पांडुरंगाच्या महापुजेसाठी येण्याआधी मुख्यमंत्री साहेबांनी ‘या’ मागण्यांची पुर्तता करावी ….अन्यथा आषाढी एकादशी दिवशी गनिमी काव्याने आंदोलन करणार-गणेश अंकुशराव

गेल्या कित्येक वर्षांपासून भुवैकुंठ पंढरी नगरीतील अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहेत. राज्यात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले आणि गेले परंतु अद्यापही पांडुरंगाच्या नगरीत वास्तव्य करणारे नागरिक विविध सोयी-सुविधांपासुन वंचित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांनी या आषाढी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची महापुजा करण्यासाठी पंढरपूरला येण्यापूर्वी येथील एमआयडीसी, महाद्वार वेसची पुनर्बांधणी, चंद्रभागेची प्रदुषणमुक्ती, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेतील स्मारक, नगरपालिका करमुक्ती, रस्ते दुरुस्ती व आमचे आदिवासी महादेव कोळी जामातीच्या मागण्या तसेच उजनी धरणाचे पाणी पावसाळ्यात सोडण्याचं योग्य नियोजन आदी मुलभूत आणि प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचा अजेंडा घेवूनच पंढरीत यावे.  अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने गनिमी काव्याने तीव्र आंदोलन करु! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

मुख्यमंत्री साहेब आदिवासी महादेव कोळी जमातीच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्‍न आणि आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे चंद्रभागेतील स्मारक उभारणीचा प्रश्‍न वर्षानुवर्षे रेंगाळत पडलेला आहे. चंद्रभागेच्या तीरावरच भक्त पुंडलिकाच्या साक्षीनं आपण हा प्रश्‍न सोडवण्याचं आश्‍वासन दिलं होतं; परंतु अद्यापही याची वचनपुर्ती केली नाहीत.  गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यात उजनी धरणावरील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अविचाराने धरणातुन सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेच्या काठावरील अनेक गावांना आणि पंढरपूर शहरालाही महापुराचा तीव्र तडाखा बसला होता. त्यामुळे यंदा व यापुढे तशी परिस्थिती पुन्हा उद्भवु नये यासाठी उजनी धरणावरील पाणी सोडणेबाबत योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.

पंढरपूर शहरातील उच्चशिक्षीत गुणवंत तरुणाई इथे हाताला रोजगार नसल्याने बाहेरगावाला जात आहे. इथल्या गुणवत्तेचा वापर येथील विकासासाठी होत नसून इतर शहरांच्या विकासासाठी होतोय. त्यामुळे इथं एमआयडीसी ची उभारणी होणं आवश्यक आहे. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर प्राचीन काळाच्या वैभवाची साक्ष देणारी पुरातन महाद्वार वेस पाडली गेल्याने भुवैकुंठ पंढरी नगरीचं ऐतिहासिक सौंदर्य लोप पावलेलं आहे. पाडल्या गेलेल्या याच वेशीच्या छायाचित्रावरुन प्रतिरुप ठरेल अशी महाद्वार वेस पुन्हा बांधावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे. याचबरोबर पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची प्रलंबित कामे पुर्ण होणे आवश्यक आहे. कोरोना काळात कामधंदे बंद असल्याने स्थानिक नागरिकांचे आर्थिक स्त्रोत बंद असल्यानेे नागरिकांना दैनंदिन गरजा भागवणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेने नागरिकांना करमुक्ती जाहीर करावी. कोरोनामुळे पंढरीच्या विविध यात्रा शासनाने रद्द केल्याने स्थानिक नागरिकांची आर्थिक उलाढाल ठप्प झालेली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील वारीवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत घोषीत करावी.

वरील सर्व मागण्यांची पुर्तता करण्याचे योग्य नियोजन करुनच मुख्यमंत्री साहेबांनी भुवैकुंठ पंढरी नगरीत श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या महापुजेस यावं अन्यथा सर्व प्रशासकीय यंत्रणेला गुंगारा देवून आम्ही आमच्या स्टाईलने गनिमी काव्याचा अवलंब करत आंदोलन करु. असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

13 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

13 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago