शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा पंढरपूरात शुभारंभ

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या संकल्पनेतून राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यास सुरुवात  झाली असून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंढरपुरातील प्रत्येक प्रभागात जाऊन  सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी जाणून घेणार आहेत.राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या हितासाठी करीत असलेले कार्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी घेत असलेले विविध निर्णय आणि या बाबत जनतेचे प्रबोधन या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना शिवसेनेचे कान,आणि डोळे असलेले शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या शिवसंपर्क अभियानातून जनतेच्या समस्या जाणून घेतील व त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापर्यत पोहोचवतील अशी ग्वाही या अभियानाच्या शुभारंभ प्रसांगी पंढरपूर शहरात आयोजित बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे. 
   या शुभारंभ प्रसंगी बोलताना शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी या  शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यशासनाने घेतलेले अनेक लोकहिताचे निर्णय जनतेपर्यत पोचविणे,कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षा चालक,पथविक्रेते यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ मिळाला का याची माहिती घेणे व त्यातील अडचणी दूर करणे,स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेले धान्य पात्र शिधापत्रिका धारकांना मिळण्याबाबत तक्रारींचे निराकरण करणे,महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यातील अडचणी जाणून घेणे,याच बरोबर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेला देणे व त्याबाबत अडचणी दूर करणे हा या शिवसंर्पक अभियानाचा हेतू असल्याचे सांगितले.तर गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हे आपले ध्येय असल्याचे सांगितले. 
  यावेळी बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख रवी मुळे यांनी या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक शिवसेना शाखा प्रमुख व शिवसैनिक त्या त्या भागातील नागिरकांच्या घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेत ठोस प्रयत्न करतील अशी ग्वाही देत पंढरपूर नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना सामान्य जनतेच्या पाठबळावर मोठे यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला.                   
यावेळी सोलापुर  भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख  सुधीर अभंगराव,शिवसेना तालुका प्रमुख  महावीर देशमुख, शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख रविंद्र मुळे,जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे,शिवसेना पंढरपुर-मंगळवेढा समन्वयक संजय घोडके,जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे,सिद्धनाथ कोरे,शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, सचिन बंदपट्टे,विनय वनारे,पोपट नाना सावतराव,बाबा अभंगराव,समाधान अधटराव,  अविनाश वाळके,तानाजी मोरे,शहर प्रसिद्धी प्रमुख अमित गायकवाड, विभाग प्रमुख  पंकज डांगे-कोळी, सूरज गायकवाड, अरुण कांबळे, ईश्वर साळूंखे, मनोज शिंदे,महेश मेहेर यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago