सोलापूर जिल्ह्यातील खाद्य पदार्थ उत्पादक विक्रेते,रिपॅकर्स,रिलेबलर्स यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत डि-1 परतावा दाखल करावा

 

सोलापूर जिल्हा व शहरातील सर्व उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स यांना सुचित करण्यात येते की, 2020-21 या कालावधीतील डि-1 परतावा 31 मे 2021 पर्यंत भरण्याची मुदत होती. तथापि, सध्या Covid-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामध्ये लॉकडाऊन दरम्यान डि-1 परतावा जमा करण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता वार्षिक परतावा सादर करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार सर्व उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स आस्थापनांनी 01 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीचा वार्षिक परतावा फॉर्म डी 1 स्वरुपात भरुन ते या कार्यालयाच्या ईमेलवर (fdasolapur@gmail.com) अथवा प्रत्यक्ष/पोस्टाव्दारे 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पाठविण्यात यावे. तसेच मागील डि-1 परताव्याची पोच सोबत जोडावे.
तसेच उपरोक्त कालावधीतील डि-1 परतावा FOSCOS-https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर दाखल करणे बंधनकारक केले आहे यांची सर्व उत्पादकांनी नोंद घ्यावी.
सर्व अन्न उत्पादकांनी 2020-2021 या कालावधीचा डि-1 परतावा 31 ऑगस्ट 2021 पुर्वी सादर न केल्यास त्यांना 01 सप्टेंबर 2021 पासुन प्रत्येक दिवशी 100/- रुपये प्रमाणे विलंब शुल्क आकारण्यात येईल.
ज्या अन्न पदार्थ उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स, आयात/निर्यातदार उत्पादक आस्थापनेकडून परतावा सादर केल्याचे दिसुन न आल्यास त्यांचेविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कलम 58 नुसार मा. न्यायनिर्णय अधिकारी तथा सह आयुक्त (अन्न), पुणे विभाग, पुणे यांच्याकडे न्यायनिर्णय प्रकरण प्रस्तावित करण्यात येईल याची सर्व अन्न पदार्थ उत्पादक, रिपॅकर, रिलेबलर्स यांनी नोंद घ्यावी. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 58 चा भंग केल्यास रुपये 2,00,000/- (2 लाख) पर्यंत दंड होऊ शकतो असे आव्हान अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांनी केलेली आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

56 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago