प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बदलीच्या चर्चेने पंढरपूर शहर तालुक्यात अस्वस्थता

पंढरपूर शहर व तालुक्यात सध्या प्रांताधिकारी सचिन ढोले यांची बदली होणार असल्याच्या चर्चेने मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या शहर व तालुक्यातील गावागावातील सर्व सामान्य नागिरकांशी संपर्क ठेवत,तसेच सामाजिक व राजकीय पटलावर काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत सामान्य जनतेच्या अनेक रखडलेल्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढला,अनेक वाद संपुष्ठात आणले तर कुठल्याही तक्ररीची दखल घेत त्याची शहनिशा करत कार्यवाही केली,गेल्या १६ महिन्यापासून कोरोनाचे संकट कोसळले आणि प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दाखवलेली तत्परता,केलेले कार्य हे अतुलनीय आहे.आता तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिलेला असताना प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदली होणार असल्याची चर्चा कानी पडताच मोठी खंत व्यक्त केली जात असून याचाच एक भाग म्हणून आदिम विकास परिषदेच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर याना निवेदन देऊन प्रांताधिकारी सचिन ढोले यांना मुदतवाढ देऊन बदली करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.        या बाबत अधिक माहिती देताना आदिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव म्हणाले कि,पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून सचिन ढोले यांची कारकीर्द आणि लोकाभिमुख कार्यकेल्याने असलेली त्यांची लोकप्रियता हि न भूतो न भविष्यती अशी आहे,पंढरपूरला जोडणाऱ्या आळंदी ते मोहोळ या रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम असो अथवा पंढरपूरला जोडलेल्या प्रत्येक महत्वपूर्ण महामार्गाचे काम असो सचिन ढोले यांनी भूसंपादन प्रक्रिया अतिशय पारदर्शक व समन्यायी पद्धतीने राबिल्याने या रस्त्याची कामे गतीने पूर्णत्वाकडे जात आहेत.महसूल विभागाकडे प्रलंबित असलेले अनेक जमिनी बाबतचे तंटे त्याच्या कारकिर्दीत गतीने निकालात निघाले आहेत.गेल्या १६ महिण्यापासुन राज्यासह पंढरपूर तालुक्यावर ओढवलेल्या कोरोनाच्या भीषण संकटात,पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पार पाडलेली जबाबदारी,सामान्य जनतेशी अगदी रात्री अपरात्री संपर्क केल्यानंतरही साधलेला संवाद,सोडवलेल्या अडचणी यामुळे जनतेस मोठा दिलासा मिळाला आहे.आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना व पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने कोरोनाचा धोका मोठा असताना अनुभवी अधिकारी सचिन ढोले यांची बदली झाली तर ती मोठे नुकसान करणारी ठरणार आहे.याचा गंभीर विचार करून प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा कार्यकाळ वाढविण्यात यावा अशी मागणी सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली असल्याची माहिती नागेश अधटराव यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago