ताज्याघडामोडी

भाजपच्या आमदाराला जुगार खेळताना अटक

आमदार म्हणजे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा नेता अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते.मात्र काही लोकप्रतिनिधींना अनेक निरनिराळे छंद असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे,मात्र उंच लोक उंची पसंद असा समज जोपासत अनेक वेळा  सामान्य जनता अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करते.पण कधीमधी असा एखादा लोकप्रतिनिधी असे काही कृत्य करताना रंगेहाथ सापडतो आणि याची चर्चा राज्यभरात होताना दिसून येते.
सध्या गुजरातमध्ये भाजपचे आमदार केसरीसिंग सोलंकी आणि इतर 25 जणांना जुगार आणि मद्यपान केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाची खुमासदार चर्चा  गुजरातमध्ये होत आहे.जुगार खेळत असताना  आणि दारू बाळगल्या प्रकरणी पंचमहाल जिल्हा पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

     गुरुवारी रात्री पंचमहाल जिल्ह्यातील एका आलिशान रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला असता हा प्रकार उघडकीस आला आहे.सोलंकी आणि इतर 25 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्याही जप्त केल्या. पुढील तपास सुरू आहे. 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago