पंढरीतील पुंडलिक नगर येथे घरफोडी

पंढरपूर शहरातील पुंडलिक नगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या बंगल्याच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने,रोख रक्कम व मोबाईल लंपास केला आहे.दाट लोकवस्ती आणि वर्दळीचा परिसर असलेल्या पुंडलिक नगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
     या याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पुंडलिक नगर येथे राहणारे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी गोविंद रघुनाथ सबनीस हे दिनांक 28/06/2021रोजी सकाळी नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी गेले होते.30/06/2021रोजी सकाळी सकाळी त्यांच्या शेजाऱ्याने सबनीस याना दरवाजाचे कुलुप बाहेर पडलेले दिसत आहे तुम्ही लवकर या असा फोन केला.श्रीपाद सबनीस हे दुपारी पंढपुरात घरी आले असता त्यांना घराचे दाराचे कुलूप,कुलुप तोडण्याकरीता वापरलेल्या कटावणी, स्क्रु ड्रायव्हर दारातच पडलेले दिसले.त्यांनी घरातील पाहणी केली असता १) 28 ग्रँम वजनाचा सोन्याचा नेकलेस २) 4 ग्रँम वजनाचे सोन्याचे टॉप्स 3) चांदीचे शिक्के लक्ष्मी/गणपती चे चित्र असलेले 16 नग प्रत्येकी 10ग्रँम वजनाचे ४) जुनी चांदीची 3नाणी ५)१0 रु ची 400 नाणी ६)4,000/-रुपये रोख रक्कम ७)मेरिकन डायमंड 5 ग्रँम वजनाचे ८)एक ASUS कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे आढळून आल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात भादंवि ३८०,४५४,४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago