‘लोटस स्कुल मधील शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे’

पंढरपूर शहर तालुक्यात नामांकित असलेल्या लोटस इंग्लिश मिडीयम स्कुल येथील एका शिक्षिकेच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत आहोत असा मेसेज शाळेच्या कर्मचाऱ्याच्या व्हाट्स अप ग्रुपवर टाकत गोपाळपूर येथील एक महिला शिक्षिका बेपत्ता झाली असून या बाबत गोपाळपूर येथील सदर महिलेच्या नातेवाईकाने तालुका पोलीस ठाण्यास याची माहिती दिली आहे.व सदर बेपत्ता शिक्षिकेचा शोध घ्यावा अशी विनंती केली आहे. 
  तालुक्यातील जुन्या कासेगाव रस्त्यावरील लोटस इंग्लिश मिडीयम स्कुल हे पंढरपुर तालुक्यातील एक नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते.या संस्थेस शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नसल्याने संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोबदल्यात अनेक कर्मचारी काम करत आहेत.भाजपचे नेते डॉ.बी.पी.रोंगे यांच्या अधिपत्याखालील हि शाळा असल्याने लोटस शाळेस वलय प्राप्त झाले आहे.
   राज्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कुठे संस्थापक,संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यातील वाद चर्चेत येतो तर कुठे अशा खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांमधील अंतरकलहाची चर्चा विविध घटनांमुळे होते.तर काही प्रकरणामध्ये शिक्षण संस्था चालकच एखाद्या कर्मचाऱ्यास त्रास देण्यासाठी प्रोत्साहन देतात असेही आढळून आले आहे.
     गोपाळपूर येथील सदर शिक्षिकेस नक्की कशामुळे त्रास दिला जात होता हेही स्पष्ट होणे गरजेचे झाले आहे.सदर महिला शिक्षिका सद्या तरी बेपत्ता असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी व्हाट्स अप ग्रुपवर मेसेज केल्याप्रमाणे सदर महिलेने आपल्या जीवाचे काही बरेवाईट केले नसावे ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.                                     
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago