पंढरपुरात चाकूचा धाक दाखवून कारचालकाला लुटले

पंढपुरात आळंदी येथील व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून मोबाईल व १३ हजार रोख रक्कम आणि पॅनकार्ड लंपास केले आहे.या बाबत  आळंदी तालुका खेड येथील रहिवाशी श्रीमंत मल्लीकार्जुन म्हेत्रे, वय 35 वर्षे, धंदा नोकरी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 या बाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीमंत मल्लीकार्जुन म्हेत्रे हे टाटा मोटर्स कारप्लान्ट, चिखली, पुणे या कंपनीत ऑपरेटर म्हणुन नोकरीस आहेत. ते मुळचे नंदूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर असुन येथील असून त्या ठिकाणी पत्नी व मुलगी यांना नेण्यासाठी दि. 26/06/2021 रोजी सायं. 07/00 वा टाटा इंडिका व्हिस्टा रजि. क्र. एम. एच. 14 डीए 6052 हे वाहन घेऊन निघाले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास ते चंद्रभागा नदीवरील अहिल्या पूल ओलांडून पुढे आले असता एका मोटार सायकल वरून दोन इसम येऊन त्यांनी इंडिका गाडीच्या आडवी दुचाकी लावून कारचा दरवाजा जबरदस्तीने उघडला.चाकुचा धाक दाखवुन शर्टाच्या खिशातील समसंग कंपनीचा मोबाईल काढुन घेतला व त्यानेच माझे शर्ट पँट चे खिसे तपासले.त्यानंतर दुसऱ्याने (वर्णन- वय 35 ते 40 वर्षे, बुटका, बांधा मजबुत, डाव्या कानास भजा असलेला ) कारचा दरवाजा उघडुन त्यातील जाभळ्या रंगाची बग त्यातील साहित्यासह रोख रु. 13,000/-, पनकार्ड घेतले व घडला प्रकार कोणाला सांगितल्यास पाहुन घेवु अशी धमकी देवुन मोटारसायकल वरुन निघुन गेले. या प्रकरणी २ अज्ञात इसमा विरोधात भादंवि कलम ३४,३४१,३९२,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago