पोलीस उपनिरीक्षीकेच्या पतीसह पोलीस कॉन्स्टेबलला थरारक पाठलाग करून पकडले

औंध जिल्हा सातारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदार यांचे भावास आरोपी न करण्यासाठी व तपासात  मदत करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत दादासो शिंदे (वय- 34) व सुशांत सुरेश वरुडे (वय- 35) या दोघांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली आहे तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली होती.यामध्ये तडजोडी अंती सुशांत सुरेश वरुडे (वय- 35) यांना औंध येथील घाटमाथ्यानजीक 50 हजार रुपयांची लाच संबंधित तक्रारदरकडून घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात येताच या दोन्ही आरोपीने पळ काढला पण थरारक पाठलाग करून त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.
    या प्रकरणी चंद्रकांत शिंदे व सुशांत वरुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सुशांत वरुडे औंध पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे यांचे पती असल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला अविनाश जगताप, उपनिरीक्षक आनंदराव सपकाळ, काटवटे हवालदार संजय साळुंखे पोलिस नाईक संजय अडसूळ, विनोद राजे, प्रशांत ताटे, विशाल खरात, मारुती अडागळे संभाजी काटकर, निलेश येवले, तुषार भोसले, निलेश वायदंडे, शितल सपकाळ यांनी ही कारवाई मध्ये सहभाग घेतला.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

18 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

18 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago