ताज्याघडामोडी

प्रियकराच्या आत्महत्येनंतर 15 दिवसाने तिनेही गळफास घेत केली आत्महत्या

औरंगाबाद | येथील एकता नगरमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. पंधरा दिवसापूर्वी विवाह ठरलेल्या मुलाने आत्महत्या केल्याच्या तणावातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.हाती आलेल्या माहिती नुसार, खुशी रमेश कलवले (वय १७, रा.गायकवाड हौसिंग सोसायटी, एकता नगर, जटवाडा रोड ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

खुशी पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून पार्लरचे काम करत होती. खुशीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी घरच्यांचे एकमत करून तिने महिन्यापूर्वी विवाह ठरवला होता. परंतु विवाह ठरलेल्या तरुणाने १५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली. यामुळे खुशी पंधरा दिवसांपासून तणावात होती. त्याचवेळी शनिवारी दुपारी आई घरा बाहेर दळण करत असताना खुशीने स्वयंपाक घरात सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.

घडलेला प्रकार आईच्या लक्षात येताच नागरिकांच्या मदतीने खुशीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव करीत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago