मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस त्यांनी घेतले होते मात्र तरीही त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉ. दीपक सावंत यांनी, पॉझिटिव्ह झाल्यानंतर ते अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान गेल्या आठ दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करावी असे आवाहन सावंत यांनी केले आहे.
विशेष म्हणजे सावंत यांनी दि. 16 जानेवारी व दि. 16 फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे डोस घेतले होते.
एक महिन्यापूर्वी त्यांच्या शरीरात 268 अँटीबॉडीज होत्या. तरी पुन्हा करोनाची लागण झाल्याने बूस्टर डोस घेण्याच्या आवश्यकते बाबत आयसीएमआरने निकष ठरवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. दीपक सावंत यांनी करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अभ्यासपूर्ण लिखाण केले आहे. मळम कोरोनाची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या सोमवारी दि. 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता वर्षा बंगल्यावर होणार होता. मात्र सदर कार्यक्रम रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…