गुन्हे विश्व

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIA चा छापा

मुंबई- एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयए कडून छापेमारी करण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर सकाळी सहा वाजता हा छापा टाकण्यात आला आहे. प्रदिप शर्मा आणि सचिन वाझे हे मित्र आहेत. शर्मा यांच्याबाबत काही लिंक मिळाल्या असल्याची माहिती एनआयए मिळाली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए तपास करत आहे. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.

सकाळी ६ वाजल्यापासून प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएची टीम दाखल झाली आहे.

स्वतः सीआरपीएफचे डीसीपी या छापेमारी दरम्यान उपस्थितीत आहेत. सेंट्रल रिझर्व्ह पोलिसांच्या १० ते १२ टीम प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आल्या आहेत.

प्रदीप शर्मा यांच्याकडे ७ एप्रिलला सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर ८ एप्रिलला त्यांना एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जुने सहकारी सचिन वाझे यांना समोर आणून शर्मा यांच्याकडे एनआयएने चौकशी केल्याची माहिती मिळाली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

35 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago