तीन दिवसापूर्वी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाची फिर्याद दाखल

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात येऊन तुम्ही माझी तक्रार का दाखल करून घेत नाही असा प्रश्न विचारत ठाणे अंमलदाराच्या समोरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याच्या ठाणे अमंलदाराकडून तीनच दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.या प्रकरणी तानाजी कांबळे व त्यांच्या पत्नी विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली भादंवि ३०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज याच प्रकरणाचा दुसरा अध्याय समोर आला असून तानाजी कांबळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मी टाकळी येथील १७ जणांविरोधात अट्रोसिटी कायद्यासह भादंविच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                या बाबत तानाजी गोविंद कांबळे वय 42 वर्षे रा. लक्ष्मी टाकळी ता.पंढरपुर यानी दाखल फिर्यादी नुसार फिर्यादीची मौजे कासेगाव ता. पंढरपुर गावचे शिवारात जमीन गट नं. 2020/2/2ब व 2021/1ची मीऴुन फिर्यादीच्या मालकीची 03 एकर शेत जमीन असुन शेतातच वस्ती करुन ते पत्नी राणी, आई रुक्मीणीबाई, मुलगा प्रथमेश मुलगी प्रज्ञा,व प्रणाली असे एकत्रात राहतात व शेती करुन कुढुंबाची उपजिवीका भागवतात.त्यांच्या शेतजमिनीत वहिवाट करण्यास व कसण्यास वेळावेळी विरोध करून विविध प्रकारे अडथळे आणत मोठे आर्थिक नुकसान केल्याची फिर्याद तानाजी कांबळे याने तालुका पोलीस ठाण्यात केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago