गुन्हे विश्व

डोंबे गल्ली परिसरात दोन मोटारसायकली पेटवून दिल्या,हजारोंचे नुकसान

गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व परिसरात मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असून सध्या शहरात याची चर्चा होत असतानाच शहरातील डोंबे गल्ली परिसरात असलेल्या कुंभार वाडा येथील रहिवाशी शिवाजी पांडुरंग वैरागकर यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांच्या मालकीची हिरो पॅशन प्रो हि मोटार सायकल व अण्णा गोपाळ दांडगे यांच्या मालकीची स्प्लेंडर प्लस हि मोटारसायकल मध्यरात्री १० जून रोजी दोनचे सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून पेटवून दिल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार फिर्यादी शिवाजी वैरागकर हे आपली मोटारसायकल घरसमोरील पाटणकर वारकरी यांच्या मोकळ्या जागेत लावून जेवण करून झोपी गेले असता पहाटे अडीचच्या सुमारास त्यांच्या आईस जाग आली असता घरासमोरील दोन्ही मोटार सायकल जळत असल्याचे दिसून आले. यामध्ये होंडा पँशन प्रो पांढरा पट्टा असलेली मोटारसायकल नं.MH 13 DA 1002 व अण्णा गोपाळ दांडगे यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल नं MH13 BY4478या दोन्ही मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रकरणी अज्ञात इसमा विरोधात भादंवि ३३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago