ताज्याघडामोडी

भाजपा मीडिया सेल सोलापूर जिल्हाध्यक्षाच्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई

भाजपा मीडिया सेलचा सोलापूर जिल्ह्ध्यक्ष सागर लेंगरे याच्या मालकीच्या हॉटेल सागरवर मोहोळ पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईत वाहनासह १४ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
      गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांची अवैध दारू विक्री उजेडात आणली आहे.लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुप्पट तिप्पट दराने बेकायदा दारू विक्री होत असल्याचे आढळून येत होते.एकीकडे लॉकडाऊनचा बंदोबस्त तर दुसरीकडे अवैध धंद्यांवर कारवाई अशी दुहेरी जबाबदारी पोलिसांकडून पार पाडली जात असतानाच अवैध आणि बेकायदा दारू विक्री होत असताना उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र कारवाई का होत नाही असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे दिसून आले.
    पोलीस निरीक्षक अशोक सायकर आणि त्यांचे सहकारी हे पेट्रोलिंग करत असताना कन्या प्रशालेनजीक हॉटेल सागर येथे काही इसम  वाहनामध्ये दारूचे बॉक्स भरताना आढळून आले.या बाबत संशय आल्याने पोलिसांनी हॉटेलची आणि वहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला.मोहोळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोहोळ परिसरात समाधान व्यक्त केले जात उत्पादन शुल्क विभागाने मनात आणले तर या अवैध दारू विक्रीच्या मुळाशी जाता येणे शक्य असताना,अनेक ठिकाणी बनावट दारूची विक्री केली जात असल्याची चर्चा होत असताना उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोड मध्ये केव्हा येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

5 days ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

2 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

2 weeks ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

3 weeks ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 month ago