करोना बाधितांची संख्या घटत आहेत. बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल होत आहेत; मात्र तरीही अद्याप यंदाच्या आषाढी वारीबद्दल निर्णय झालेला नाही. वारकऱ्यांनी सरकारकडे यंदा किमान पायी वारीची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
सरकार म्हणेल ते नियम आम्ही पाळू, असे म्हणत वारकरी संप्रदायाने सरकारला तीन पर्याय दिले आहेत. सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल; मात्र सरकारने पायी दिंडी सोहळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी अभय टिळक यांनी केली आहे.
‘देहू, आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर या देवसंस्थानांच्या वारी सोहळ्यासाठी सरकारने प्रत्येकी 500 वारकऱ्यांसह सोहळ्याला परवानगी द्यावी. करोना स्थिती वाढली, तर, 200 वारकऱ्यांना परवानगी द्यावी. एवढेच नाही तर अगदीच स्थिती बिघडली तर 100 जणांना तरी पायी दिंडी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. वारकऱ्यांनी असे 3 पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत,’ अशी माहिती अभय टिळक यांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…