दुकाने उघडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली अनेक निर्बंध लादले असून अत्यवश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने,आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत.या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने  पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज गुरुवार दिनांक ३ जून रोजी शहरातील विविध भागात कारवाई करीत ४ दुकानदाराविरोधात भादवि क.188,269प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजच्या कारवाईत शहरातील नवीपेठ परिसरातील इंद्रायणी साडी सेंटर,दीपक ड्रेसेस,प्रशांत शिलाई मशीन, झेंडा चौक परिसरातील निकते स्टेशनरी हे दुकाने जिल्हाधीकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग करत उघडण्यात आली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हि कारवाई करण्यात आली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago