ताज्याघडामोडी

पंढरीत जागतिक सायकल दिन साजरा

पंढरीत जागतिक सायकल दिन साजरा
पंढरपूर (प्रतिनिधी):- जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलचे महत्व पटवून देण्यास्तव पंढरी सायकल मॅरेथॅान व आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन तर्फे सायकल रॅलीचे आयोजन सर्व कोरोणा चे नियम पाळून करण्यात आले होते. या सायकल रॅलीत पंढरी सायकल मॅरेथॉनचे मुख्य आयोजक सागर कदम, साहित्यिक राधेश बादले पाटील, युवक कॅांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शंकर सुरवसे, अशोक किणगी, संतोष माने, शेखर भोसले, जागतिक सायकलपटू दिगंबर भोसले, पंढरी सायकल मॅरेथॉनच्या महिला सदस्या चारुशीला कुलकर्णी व राधा मलपे तसेच सोमनाथ गांगुर्डे, सचिन कारंडे, अमर पाटसकर आदि मान्यवर सहभागी होते.
          आज ३ जून हा जागतिक सायकल दिन आहे. अनेकांनी अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दि.१२-०४-२०१८ रोजी एका ठरावान्वये ३ जून हा दिवस दरवर्षी जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आरोग्यसंपन्नता, प्रदुषणमुक्ती, इंधनबचत, आदिं कारणास्तव सायकल चालविणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही पंढरपूरकर फॅाउंडेशन व पंढरी सायकल मॅरेथॅान तर्फे पंढरपुरमध्ये जागतिक सायकल दिन साजरा केल्याची माहिती मुख्य आयोजक सागर शरद कदम यांनी दिली.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago