ताज्याघडामोडी

लॉकडाऊनच्या विरोधात सोलापुरात व्यापारी संतप्त

राज्यातील कोरोना बाधितांचा आलेख खाली येऊ लागताच गेल्या सुमारे ५० दिवसापासून बंद असलेले व्यवसाय सुरळीत सुरु व्हावेत अशी मागणी राज्यातील व्यापाऱ्यांकडून होताना दिसून येत असुन राज्य शासनाने १जून पासून अनेक नियम शिथिल केले असले आहेत.राज्यात पुणे मुबंईत अत्यावश्य्क सेवा वगळता इतर दुकानेही सुरु होऊ लागली असताना सोलापुरात मात्र दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी जे नियम ग्रामीण भागाला लागू केले आहेत त्याच नियमाचा आधार घेऊन सोलापुरात देखील महापालिका आयुक्तांनी इतर दुकाने उघडण्यास परवानगी नाकारली आहे.सोलापूर शहराची लोकसंख्य १० लाखापेक्षा कमी आहे असे या व्यापाऱ्याचे म्हणणे असून तरी देखील आम्हास दुकाने उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे असा संताप व्यक्त करीत माजी आमदार दिलीप माने यांच्या सह अनेक दुकानदारांनी सोलापूर महापालिकेच्या दारात ठिय्या मांडला.

      सोलापूर शहराची लोकसंख्या सध्या 10 लाखाहून अधिक आहे. तसेच शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ 2 ते 3 टक्के आहे. तसेच शहरात 55 टक्के ऑक्सिजन बेड देखील शिल्लक आहेत. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र निर्णय काढून शहरातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.व्यापारी मृत्यूशय्येवर आहे, हे दाखवण्यासाठी एका व्यापाऱ्याला प्रतिकात्मकरित्या सलाईन लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जात आहे. सोलापूर शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असताना देखील केवळ नियमांमुळे प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये कोणतेही शिथिलता दिलेली नाही, असे येथील व्यापाऱ्यांचा आरोप आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago