जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका मुलीने लग्नाच्या दिवशीच आपल्या प्रियकरासोबत आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एका युवकाने प्रेम प्रकरणात आई-वडिलांचा झालेला अपमान जिव्हारी लागल्याने आत्महत्या केली आहे. भोकरदान तालुक्यातील वालसावंगी शिवारात ही घटना घडली.
वालसंगी शिवारात तरुणानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये असही त्याने व्हिडिओत म्हटलं आहे.
सिल्लोड तालुक्यातील हत्ती बाहुली गावातील एकवीस वर्षीय तरुण सुमीत किशोर पारधे या तरुणाचे प्रेम प्रकरणातून वाद झाले होते.
या वादातून त्याच्या आई वडिलांवर माफी मागण्याची वेळ आली होती. आई वडिलांचा झालेला हा अपमान सुमीतच्या जिव्हारी लागला होता. आई वडिलांची इज्जत आपण धुळीत मिळवली या अपराधी भावनेनं सुमीतनं आत्महत्या केली.
सुमीत वालसावंगी गावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होता. मात्र रस्त्याने जात असताना त्याची गाडी पंक्चर झाली होती. तेव्हा सुमीतच्या साथीदार गाडी पंक्चर काढण्यासाठी गेला. तर सुमीत गोळी आणायची सांगून वालसावंगी शिवारातील वनीकरण विभागाच्या झुडपात गेला. तिथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…