गुन्हे विश्व

निर्दयी बापानं पोटच्या २ मुलांची दगडाने ठेचून केली हत्या, नंतर मृतदेह फेकले विहिरीत, स्वत:चाही कापला गळा

पोटच्या दोन मुलांना दगडान ठेचून त्यांचा खून करुन मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुंदेलखंडच्या झाशी जिल्ह्यात रानीपूर येथे घडली आहे. त्यांनतर या व्यक्तीनं स्वत:चा गळा कापून विहीरत उडी घेतली. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती द्वारे समोर आले आहे. रहिश असे पित्याचे नाव असून हर्ष (वय १२), अंश (वय ९) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

२२ मे रोजी रहिशचे आपल्या पत्नीबरोबर जोरदार भांडण झाले होते. रहिशला दारूचे व्यसन असल्यामुळे तो आपल्या पत्नीसोबत वारंवर भांडण करत असे. दरम्यान रहिश आपल्या मुलांसह कपडे घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडला.

संध्याकाळ झाली तरी ते तिघंही परतले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असताना येथील नागरिकांना लाडगंज येथील केदारेश्वर मंदिराजवळील विहिरीच्या ठिकाणी रक्ताचे डाग पाहिले. यामुळे विहिरीत वाकून पाहिले असता विहिरीमध्ये त्यांना रहिश आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार, कौटुंबिक वादातून रहिशने हे जीवघेणं कृत्य केल्याचा संशय आहे. सुरुवातीला त्याने लहान मुलांची हत्या केली त्यानंतर स्वत:चा गळा कापून विहिरीत उडी मारली त्यात त्याचाही मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago