नवी दिल्ली, 23 मे : अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यात लोकांनी त्यांच्या आयडीच्या प्रुफच्या आधारे, कोणी बनावट सिमचा वापर करत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. देशात अनेकदा गुन्हेगार बनावट सिम कार्डचा वापर करतात आणि त्या कामासाठी चुकीच्या पद्धतीने सिम मिळवतात. त्यामुळे तुमच्या नावावर कोणी बनावट, खोटं सिम कार्ड तर वापरत नाही ना, हे पाहाणं गरजेचं आहे.
ऑनलाईन मिळेल माहिती
भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने लोकांच्या या समस्या सोडवण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल लाँच केलं आहे. कोणतीही व्यक्ती tafcop.dgtelecom.gov.in या वेब पोर्टलवर जाऊन सहजपणे, त्यांच्या नावावर किती सिम कार्ड वापरले जात आहेत, याची माहिती घेऊ शकतात.
तुमच्या आयडी प्रुफच्या आधारे कोणी दुसरा व्यक्ती, एखाद्या बनावट सिमचा वापर करत असेल, तर तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून त्या नंबरला ब्लॉक करू शकता. एका आयडी प्रुफच्या आधारे जास्तीत-जास्त 9 सिम कार्ड जारी केले जाऊ शकतात.
काय आहे प्रोसेस –
– सर्वात आधी वेब पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in वर क्लिक करा
– त्यानंतर वेबसाईटवर तुमचा मोबाईल नंबर टाका.
– आता मोबाईल नंबरवर वेरिफिकेशनसाठी एक ओटीपी येईल.
– ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर वेरिफाय होईल.
– त्यानंतर स्क्रिनवर त्या नंबर्सची लिस्ट समोर येईल, जे तुमच्या आयडी प्रुफवर चालवले जात आहेत.
– जर तुमच्या नावावर कोणी बनावट सिम चालवलं जात असेल, तर तुम्ही त्याबाबत रिपोर्ट करू शकता.
– पोर्टलवर तुमची तक्रार दाखल केली जाईल आणि त्याची चौकशीही होईल.
– तक्रार योग्य असल्यास समोर आल्यास, तो नंबर ब्लॉक केला जाईल.
– त्यानंतर बनावट नंबरची चौकशी होईल
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…