आरोग्य भरती पारदर्शी पद्धतीने करा – भाजयुमो
भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा च्या वतीने आज राज्य सरकारने घोषित केलेली आरोग्य भरती पारदर्शी पद्धतीने करावी व मार्च 2021 ला झालेल्या परिक्षेबाबत भूमिका स्पष्ट करावी असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .
या निवेदनामद्ये , सध्या राज्य सरकारचा कोणत्याच गोष्टींमध्ये भूमिका ठाम नाही . यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य असलेली आरोग्य भरती बाबत देखील सरकार गांभीर्याने विचार करत नसल्याचे दिसून येत आहे . मार्च 2021 मध्ये आरोग्य भरतीची परीक्षा घेतली परंतु त्यावेळी नाशिक , नागपूर अश्या प्रमुख स्थानांनसोबत बऱ्याच ठिकाणी पेपर फुटले गेले . पण त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यामध्ये देखील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले . त्या भरतीची अद्याप कोणतेच निर्णय सरकारने घेतले नसताना लगेच आणखी आरोग्य भरती सुरू केल्याचे दिसून येत आहे . यामध्ये जिल्हा स्थरावर वॉक इन इंटरव्ह्यू सुरू असल्याचे सांगितले जात आहे . पण याला कोणतेच निकष लावले नाहीत कोणतीच प्रक्रिया सांगितली नसून ढिसाळ कारभार सुरू आहे . सध्या एकूण वशिलेबाजी ने भरती सुरू आहे का ? अशी शंका मनामध्ये येत असून , सामान्य , गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात न टाकता ही भरती पारदर्शी पद्धतीने करावी . जिल्हा स्थरावर्ती जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील बाबतीमधील माहिती प्रकाशित करावी . अशी मागणी करण्यात अली आहे .
हे निवेदन मंगळवेढा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्ह्याधिकारी याना देण्यात आले आहे . यावेळी भाजयुमो चे शहराध्यक्ष सुशांत हजारे , सुदर्शन यादव उपस्थित होते .
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…