दोनच दिवसाचा फरक,मंगळवेढयात पॉझिटिव्ह तर पंढरपुरात निगेटीव्ह

देशभरात कोरोना बाबत जशी चर्चा होत आहे तशीच चर्चा कोरोना चाचणीच्या विश्वासाहर्ते बाबतही होत आली आहे.गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि आरटीपीसीआर हा एकमेव चाचणीचा पर्याय ठरला.आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने अँटीजेन चाचणीचा पर्याय पुढे आला.पण अँटीजेन चाचणीच्या विश्वासाहर्ते बद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत.असाच अनुभव पंढरपुर तालुक्यातील एका इसमास आला असून १७ मे रोजी मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला तर १९ मे रोजी पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला आहे.  

या घटनेमुळे पंढरपुर तालुक्यातील मनसेचा पदाधिकारी असलेल्या त्या व्यक्तीची मात्र मोठी गोची झाली आहे. सदर व्यक्तीस यापूर्वी कोरोना होऊन गेलेला आहे.व सध्या त्यास कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.मात्र  उपजिल्हा रुग्णालया सारख्या ठिकाणी करण्यात आलेल्या चाचणीत अशा प्रकारे तफावत आढळून येत असेल तर हि बाब गंभीर मानली जात आहे.       

कोरोना साठी करण्यात येणाऱ्या अँटीजेन चाचणी बाबत तज्ञ् व्यक्तीकडून अधिक माहिती घेतली असता अँटीजेन टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तो रुग्ण नक्कीच पॉझिटिव्ह असतो मात्र निगेटिव्ह रिपोर्ट येण्यामागे अनेक तांत्रिक कारणे आहेत.टेस्टसाठी स्वाब घेताना त्या व्यक्तीच्या हालचालीमुळे नाकात योग्य ठिकाणी टेस्टिंग स्टिकचा स्पर्श न होणे हे त्यातील महत्वाचे कारण आहे.आणि जरी अँटीजेन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी आरटीपीसीआर करून घेणे केव्हाही हितावह आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago