कोरोना बाधितांवरील उपचारासाठी राज्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यानी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घाव्या असे आवाहन केले होते.त्या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत धाराशिव सहकारी साखर कारखाना चोराखळी उस्मानाबाद चे चेअरमन अभिजित पाटील यांनी ऑक्सिजन प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टची अगदी काही दिवसात उभारणी केली.साखर कारखान्याच्या माध्यमातून उभारलेल्या देशातील पहिल्याच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे उदघाटन झाले.या उदघाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री अजित पवार हेही व्हीसी द्वारे सहभागी झाले होते.त्यावेळी अजितदादांनी अभिजित पाटील यांना मुंबईत आल्यानंतर भेटीचे आमंत्रण दिले होते.आज तो योग्य जुळून आला आणि मंत्रालयातील दालनात अजित पवार यांची भेट घेत अभिजित पाटील यांनी अजित पवार यांना श्री विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली.
या भेटीत ना.अजित पवार यांनी अल्पवधीत धाराशिव साखर कारखान्याने उभारलेल्या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली.तसेच डीव्हीपी समूहाच्या वतीने पंढपुरात सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलची माहितीही यावेळी त्यांना देण्यात आली.ऑक्सिजन टंचाईच्या संकटकाळात चेअरमन अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत जबाबदारी पार पाडली याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिजित पाटील यांची प्रशंसा केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…