मुंबई, 11 मे: महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचं दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona) बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 71,966 रुग्ण कोरोनामुक्त (71,966 discharged today) झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के इतके झाले आहे.
आज राज्यात 40,956 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 5,58,996 इतकी झाली आहे.
सध्या राज्यात 35,91,783 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,955 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद?
ठाणे – 5024
नाशिक – 6482
पुणे – 11191
कोल्हापूर – 3643
औरंगाबाद – 1930
लातूर – 2872
अकोला – 4376
नागपूर – 5438
एकूण – 40,956
सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 95,731 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात 53,020 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 40,162 तर ठाणे जिल्ह्यात 31,446 सक्रिय रुग्ण आहेत.
बाधितांचा आकडा मोठा
राज्यात आज 793 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 403 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 170 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 220 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…