जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अंमल सुरु असून केवळ मेडिकल दुकानाशिवाय इतर कुठल्याही आस्थापना ८ ते १५ मे या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.या आदेशाची अमंलबजावणी करण्याच्या हेतूने पंढरपूर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी पोलीस आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करताना दिसून येत आहेत.पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी कारवाई साठी भाळवणी येथे गेले असता त्या ठिकाणी गवळी ट्रेडर्स व कर्मवीर कृषी केंद्र हे दोन दुकाने उघडी ठेवत ग्राहकांना वस्तूची विक्री करण्यात येत असल्याचे दिसून आले.यावेळी पोलीस कर्मचारी कारवाई करत असताना भाळवणी येथीलच दीपक गवळी हा इसम मोटारसायकल वरून त्या ठिकाणी आला व तुम्हाला आमचीच दुकाने दिसतात काय ? गावातील दारूधंदे चालू आहेत ते दिसत नाहीत का ? असा आरडाओरडा करीत या ठिकाणी उपस्थित असलेले पो.नि.भस्मे व पोलीस कर्मचाऱयांशी हुज्जत घालू लागला, कारवाई करण्यात अडथळा आणल्याने सदर इसम दीपक रावसाहेब गवळी याच्या विरोधात भा.दं. वि. क. 353, 186, 188, 269,506 प्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…