राज्य शासनाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला खरा पण केंद्र सरकारकडून व लस उत्पादक कंपनीकडून होणारा लसीचा अपुरा पुरवठा आणि दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेले ४५ वयोगटावरील जेष्ठ नागिरक यामुळे राज्य सरकार देखील अडचणीत आले आहे.१८ ते ४४ वयोगटासाठी कोवीन ऍप द्वारे नोंदणी करण्यास २८ एप्रिल पासून सुरवात झाली खरी पण अल्पवधीतच जिल्ह्यातील या साठी नियोजित लसीकरण केंद्राचे बुकिंग फुल्ल झाले.अशातच कोवॅक्सीन लसीचा पुरवठा मंदावल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील हतबल ठरले असून आता पंढरपूर तालुक्यासाठी या वयोगटासाठी केवळ १ हजार लसी ८ ते १२ मी या कालावधीत कासेगाव आरोग्य केंद्रावर उपलब्ध होणार असल्याचे आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
१८ ते ४४ वयोगटासाठी नोंदणी सुरु झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील यासाठी निर्धारीत करण्यात आलेल्या काही आरोग्य केंद्रासाठी अनेक नागिरकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.मात्र आता पुढील ५ दिवसात केवळ कासेगाव येथील आरोग्य केंद्रासच प्रतिदिन २०० प्रमाणे १ हजार कोवोक्सीन लसीचे डोस मिळणार असल्याने तालुक्यातील इतर आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…