पुणे – लसीच्या तुटवड्याचे संकट काही दिवसांपुरते मिटणार असून, मंगळवारी राज्याला ‘कोवॅक्सिन’ लसींचा कोटा मिळणार आहे. राज्याने कोवॅक्सिन लस खरेदी केली असून, ती लवकरच राज्याच्या लसीकरण विभागाच्या ताब्यात मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून लसींचे संकट उभे राहिले असून, पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेक केंद्रांवरील लसीकरण बंद करावे लागले होते. त्यामध्ये जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांचे सेशन्स बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता संपूर्ण राज्यासाठीच लस मिळणार असून, त्यामुळे काही दिवस तरी लसीकरण मोहीम संथ गतीने तरी सुरू राहू शकते.
18 ते 44 वयोगटाला देण्यासाठी लसच मिळत नसल्याने पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू होऊ शकले नाही.दीड कोटी लसीकरणाचा टप्पा राज्याने चार महिन्यांत पूर्ण केला आहे. त्यातून पुढील चार महिन्यांत आणखी आठ कोटी लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. मात्र प्रत्यक्षात लसच उपलब्ध होत नसल्याने हे उद्दीष्ट पूर्ण होईल की नाही, हा प्रश्न आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…