विधानपरिषदेचे आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्यकेंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना पत्र दिले असून आपल्या आमदार निधीतून यासाठी २४ लाख रुपये खर्च करण्यात यावेत अशी सूचना केली आहे.या मध्ये पंढरपूर तालुक्यातील भाळवणी आणि करकंब प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.या दोन्ही ठिकाणी मिळून ८ लाख रुपये किमतीचे १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध होणार आहेत.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्समध्ये प्रेशर स्विंग ऍबसॉरबशन तंत्र वापरले जाते.त्यामाध्यमातून आजूबाजूची हवा खेचून त्यातून नायट्रोजन वेगळा करून शुद्ध ऑक्सिजन तयार होते व त्याचा थेट रुग्णाला पुरवठा करता येतो.ऑक्सिजनची कमी मागणी असलेल्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असून ऑक्सिजन रिफील करण्याची गरज नसल्याने हे मशीन अतिशय उपयोगाचे सिद्ध झाले आहे.
आमदार रणजितसिह मोहिते -पाटील यांच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्यातील जेऊर,टेम्भूर्णी,मोडनिंब,करकंब,भाळवणी मेडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना २४ लाख रुपये किमतीचे ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…