ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या बाबत सोशल मीडियावर  आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून  26 जणांच्या विरोधात पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलीस ठाण्यात  गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती.               

हा प्रकार 27 मार्च ते 7 एप्रिल 2021 या कालावधीत बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट आणि ट्‌विटर अकाउंट यावर घडला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून त्यानुसार पेज CM Devendra Fadanvis Fan Club Posted by Dhananjay Joshi, राजकारण महाराष्ट्राचे posted by राजकारण महाराष्ट्राचे posted by Sonali Rane, भाजप सोशल मीडिया वॉर रूम महाराष्ट्र Posted by Madhukar Waghmare, टकलु हैवान, Devendra Fadanvis for Maharashtra या फेसबुक पेज चालविणाऱ्या व्यक्तीतसेच फेसबुक अकाउंट धारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वम्बर देव, गोविंद कुलकर्णी, धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस जोशी, नाना पंडित, राम शिंदे पाटील, शशिकांत आहिरे, राधा माने, सोनाली राणे, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड आणि ट्‌विटर अकाउंट धारक Rudraadev , विमुक्त आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago