ताज्याघडामोडी

जिल्ह्यात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी तातडीने पावले उचला ; झेडपी पदाधिकाऱ्यांच्या प्रशासनास सूचना

  • जिल्ह्यात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी तातडीने पावले उचला ; झेडपी पदाधिकाऱ्यांच्या प्रशासनास सूचना
    सोलापूर (प्रतिनिधी)
    जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा अशा सूचना जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केल्या.
    ग्रामीण भागात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत महत्वाची बैठक अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते, या बैठकीला संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सदस्य आनंद तानवडे, मदन दराडे, ऍड सचिन देशमुख, बाळासाहेब देशमुख, गणेश पाटील, अतुल पवार, अजित तळेकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, वरिष्ठ लेखा अधिकारी सुर्वे, सरोज काझी, देवानंद गुंड , सरपंच डॉ अमित व्यवहारे, आष्टी ग्रामसेवक गडेकर हे उपस्थित होते,
    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नंतर दोन्ही तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती, कोव्हीड केअर सेंटर उभे करण्यासाठी निधीची उपलब्धता कशी होणार याची चर्चा झाली, लवकरच लवकर संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांना वेळेवर उपचार व नियंत्रणाखाली ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या विषयावर चर्चा झाली, लवकरच लवकर हे सेंटर उभे करून कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा निर्णय झाला, सदस्य तानवडे, दराडे, ऍड देशमुख यांनी विविध सूचना केल्या, या बैठकीत सरपंच डॉ अमित व्यवहारे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड सेंटरला आपली सेवा देण्याची तयारी दर्शवली.
    सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, झेडपीचा कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय स्तुत्य आहे,झेडपी सेस, आरोग्य विभागाचा निधी राज्य सरकारचा निधी वापर करावा, मोहोळ तालुक्यात आष्टी, शेटफळ, नरखेड, कुरुल, कामती, बेगमपूर याठिकाणी कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होणार आहेत.
    समाधान आवताडे म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर लवकर सुरू करावेत, रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत, गोळ्या औषधांवर बरे होणारे रुग्ण ऑक्सीजन वर किंवा व्हेंटिलेटरवर जाऊ नये, यासाठी वेळेवरच उपाययोजना कराव्यात.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago