ताज्याघडामोडी

लाच प्रकरणातील ‘त्या’ मुख्याध्यापकाची शिक्षा हायकोर्टाने केली रद्द

शिक्षण संस्थेस शासकीय मान्यता मिळवून देतो असे सांगत १ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुख्याध्यापकास अटक करून खटला दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने सदर मुख्याध्यापकास तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करताना शिक्षण विभागाने अस्तित्वातील आदेश आणि तरतुदी याचा विचार न करता व सद्सद्विवेक बुद्धीचा वापर न केल्याचे दिसून येत असल्याने मुख्याध्यापकाची शिक्षा रद्द करण्यात आली. 

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती यांच्यासमोर झाली यावेळी अपीलकर्ता मुख्याध्यपकाच्या बाजूने ऍड.गिरीश कुलकर्णी यांनी बाजू मांडत केवळ आकसबुद्धीने व गैरसमजातून हि कारवाई झाली आहे.शिक्षण विभागाने पैसे कशासाठी स्वीकारले होते,या मागची कारणे काय याचा सखोल तपास न करताच सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला.तरी सदर मुख्याध्यपकास दोषमुक्त करावे अशी मागणी त्यांनी मे.हायकोर्टासमोर केली होती.सदर प्रकरणाची शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा झाली होती.                   
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

19 hours ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago