ताज्याघडामोडी

शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेसह एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा

शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेसह एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनहित शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांनी पाठिंब्याचे पत्र शैला गोडसे यांना दिले आहे.
   यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक शेखर पाटील, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष रमेश लंगोटे, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव शेळके, तालुकाध्यक्ष तानाजी सोनवले, युवा तालुकाध्यक्ष नितीन गावडे, तालुका उपाध्यक्ष औदुंबर सुतार हे यावेळी उपस्थित होते.  शैला गोडसे यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून सर्वच स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. तसेच शैला गोडसे यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा सध्या मतदार संघात लक्षवेधक ठरत आहे. त्यामुळे शैला गोडसे यांचे विजयाकडे मार्गक्रमण होत असल्याची सध्या चर्चा मतदारसंघात होत आहे.
चौकट
शैला गोडसे या एक झुंजार नेत्या आहेत. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मोठे काम केले आहे. मी जो जनतेची सेवा करण्याचा उद्देश घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. तो उद्देश शैला गोडसे यांच्या माध्यमातून होईल असे मला वाटते. शैला गोडसे यांची यांची जनतेसाठी मोठी तळमळ आहे. त्यामुळे मी त्यांना माझ्या समर्थकांसह बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
कपिल शंकर कोळी
अपक्ष उमेदवार
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago