ताज्याघडामोडी

भूल थापानां बळी पडू नका, विकास व रोजगाराचे मुद्दे घेऊन जनतेसमोर या, भावनिक झाल्यावर पोट भरत नाही — भाजप उमेदवार समाधान आवताडे

भूल थापानां बळी पडू नका, विकास व रोजगाराचे मुद्दे घेऊन जनतेसमोर या, भावनिक झाल्यावर पोट भरत नाही — भाजप उमेदवार समाधान आवताडे 

  मंगळवेढा- भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा शनिवारी पंढरपूर शहरात प्रचार रॅली तसेच घरभेट दौरा झाला, त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवेढा व पंढरपूर मध्ये सभा झाली, त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील देगाव, शरद नगर, घरनिकी, मारापूर,  या गावात प्रचार दौरा झाला. या दौऱ्यात भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, रयतचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रा येताळा भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे,लक्ष्मण मस्के, दामाजी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अंबादास कुलकर्णी, संचालक सचिन शिवशरण यांची उपस्थिती होती.

आज कोरोना परिस्थितीच्या नावाखाली जनतेला सरकार घरी बसवत आहे, पण यांच्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, माझे कुटुंब, माझी जबाबदारी, हे स्वतःचे कुटुंब सांभाळू शकत नाहीत ते राज्य कसे चालवणार? शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली, उन्हाळ्यात पाण्याअभावी पिके जळू लागली, मंगळवेढ्यात शहरालगत 118 एकर जमीन एका सौरऊर्जा प्रकल्पासाठी घेतली, तिथं किती युवक कामाला लागले? युवा ,सुशिक्षित, बेरोजगारांचा प्रश्न गंभीर आहेत, त्यांना उद्योग उभारणे महत्वाचे आहे, असे किती उद्योजक 11 वर्षात उभारले? विकासाचा कोणताही मुद्दा नाही, आता पुन्हा मंगळवेढ्याला पाणी देतो अशी भाषा होऊ लागली आहे, त्या भूलथापांना बळी पडू नका, विकासाच्या मुद्दे घेऊन जनतेसमोर या, भावनेने कुणाचे पोट भरत नाही असा हल्लाबोल आवताडे यांनी केला.

रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले म्हणाले, 11 वर्षात काय दिले, बेरोजगार युवकांना काम देणारी संस्था उभी केली का? शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी बँक उभी केली का? काही नाही, उलट विठ्ठल कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज केले, प्रत्येक निवडणुकीला कर्ज काढायचे व निवडून यायचे आणि आपले घर भागवायचे, ज्या औदुंबर अण्णांनी भालके यांना जवळ केले, राजकारण शिकवले वेळ आल्यावर त्या अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसला. दामाजीवर 130 कोटीचे कर्ज केले, आज तेच कर्ज फेडण्याचे काम समाधान आवताडे करत आहेत, किती हा लबाडपणा आता तरी सावध व्हा, आवताडे यांना विजयी करा.

एस एम कन्ट्रक्शन असेल सूत मिल च्या नावाखाली हजारों युवकांच्या हाताला काम दिले, भालके यांनी काय दिले? मारवाडी वकील यांच्या नंतर 50 वर्षानंतर समाधान आवताडे या मंगळवेढ्याच्या भूमीपुत्राला आमदार करण्याची वेळ आली आहे, यात जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, मी नाही तर माझ्या विचारांचा माणूस व्हावी अशी त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यामुळे ही संधी परत कधीच येणार नाही असे प्रा. येताळा भगत यांनी सांगितले.

 या दरम्यान ते मारापूर गावात आले असता त्या सभेवेळी दिवंगत आमदार भारत भालके यांचे कट्टर समर्थक शंकर तात्या आसबे यांनी ग्रामपंचायत सदस्य अशोक आसबे यांच्या बरोबर आपल्या समर्थकांसह हातावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ काढून गळ्यात भाजपचा शेला घेतला.

प्रवेशानंतर शंकर आसबे म्हणाले, मी वातावरण पाहून निर्णय घेणारा माणूस आहे, तुम्ही श्रीराम, मारुती व ग्रामदैवत खंडोबाच्या या देवतांच्या आशिर्वादाने आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. मारापूर मधून 2 हजारापैकी दीड हजाराहून अधिक मतदान तुम्हाला मिळेल, आमदार झाल्यावर मारापूर आंधळगाव रस्ता करावा अशी मागणी केली.मंगळवेढा तालुक्यातील देगाव, शरद नगर, घरनिकी, , मारापूर,  या गावात प्रचार दौरा झाला. या दौऱ्यात भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, रयतचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रा येताळा भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे,लक्ष्मण मस्के,गौरीशंकर बुरकूल, संचालक राजेंद्र सुरवसे, खंडू खंदारे, गणेश गावकरे, बिरुदेव कोळेकर, अंबादास वायदंडे, त्या त्या गावचे सरपंच चेअरमन प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago