ताज्याघडामोडी

पक्षाने टाकलेली जबाबदारी आपल्याला सर्मथपणे पार पाडायची आहे-उमेश परिचारक

युटोपियन शुगरचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे नेते उमेश परिचारक यांनी पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातील भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून या मतदार संघात समाविष्ट असलेल्या काही गावातील सर्मथक पदाधीकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन ते मार्गदर्शन व सूचना करताना दिसून येत आहेत.पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी सर्मथपणे पार पाडण्यासाठी दक्ष रहा,कुठलाही गाफीलपपणा करू नका,आपल्या भागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा आणि त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगा,समाधान आवताडे यांना आपल्या गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे अशी भूमिका उमेश परिचारक हे मांडताना दिसून येत आहेत.           

     २५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी आ.प्रशांत परिचारक हे सध्या मंगळवेढा तालुक्यातील विविध गावात बैठका घेऊन मतदारांशी सवांद आहेत,महाविकास आघाडीच्या गेल्या दीड वर्षाच्या सत्ताकाळात सर्वसामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचत आहेत.तर उमेश परिचारक आणि प्रणव परिचारक हे पंढरपूर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी अधिक सजग राहून प्रचाराची  जबाबदारी पार पाडली जावी यासाठी व्यूहरचना करताना दिसून येत आहेत.             

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

9 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago