ताज्याघडामोडी

लॉकडाऊन रद्द करा अन्यथा याकाळात गोरगरीब व्यावसायिकांसाठी शासकीय अनुदान द्या.-आ.परिचारक

  महाराष्ट्र शासनाचे दि.5/4/2021 रोजीचे आदेशानुसार 30 एप्रिल अखेर अत्यावश्‍यक सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर झाल्याने पंढरपूर येथील गोरगरीब कष्टकरी व व्यापारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने आ.प्रशांत परिचारक यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीससाहेब यांचेशी संपर्क साधला व मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांना पत्राव्दारे लॉकडाऊन रद्द करा अन्यथा त्यांना उदरनिर्वाहासाठी शासकीय अनुदान द्या अशा प्रकारची पत्राव्दारे मागणी केली. आ.प्रशांत परिचारक म्हणाले, लॉकडाऊन हा कोरोना प्रादुर्भाव रोखणेचा पर्याय नाही, अनेक गोष्टी पैंकी तो एक भाग आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट हे मुख्य कोरोना प्रादुर्भाव रोखणेचे काम प्रशासनामार्फत केले जात आहे. त्यामध्ये सर्व जनता मास्क, सॅनिटायझर आदींसह सहकार्य करीत असताना लॉकडाऊन करणे चुकीचे आहे. त्यातच तीर्थक्षेत्र पंढरपूर हे चार वाऱ्यावर जगणारे गाव आहे, वर्षभरातील वारी रद्द झालेमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. पुन्हा एकदा शासनाने विठुरायाचे मंदिर बंद केलेमुळे सुरळीत होणारी आर्थिक व्यवस्था पुन्हा विस्कळीत होणेची चिन्हे निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत याचा फटका मंदिरावर अंवलबून असणाऱ्या लहानमोठा व्यापारी वर्ग, कष्टकरी, हारफुले विक्रेते, प्रासादिक भांडार, रिक्षा-टांगावाले, दैनंदिन कामकरून रोजगार करणारे गोरगरीब मजूर अशा सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे. याबाबत पंढरपूरातील व्यापारी संघटना, सर्वसामान्य व्यावसायिक यांचेमध्ये महाविकासआघाडी सरकार विरूध्द प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीनारायण भट्टड यांचेकडे आ.प्रशांत परिचारक, भाजपा महायुतीचे उमेदवार श्री.समाधान आवताडे, आ.रणजीतसिंह मोहितेपाटील, रोंगे सर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांचेसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेसमवेत आ.परिचारक यांनी फोनव्दारे चर्चा घडवून आणली, त्यांचे सूचनेनुसार तत्काळ मा.मुख्यमंत्री महोदयांना लॉकडाऊन रद्द करणेबाबत पत्रही पाठविण्यात आले.   आ.परिचारक पत्राव्दारे मागणी करताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकार लॉकडाऊन सुरू ठेवणार असल्यास पंढरपूरातील अशा कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी लॉकडाऊन काळात उदरनिर्वाहासाठी शासकीय अनुदान देणेत यावे, याबाबत शासनस्तरावर त्वरीत निर्णय व्हावा अन्यथा लॉकडाऊन रद्द करून मंदिर पुर्ववत सुरू ठेवणेत यावे. आ.प्रशांत परिचारक यांचे भूमिकेमुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

4 years ago

“भ्रष्ट कारखानदारांचा भ्रष्टाचार शैलाताई गोडसे शिट्टी वाजवून बाहेर काढणार.”.. प्रभाकर भैय्या देशमुख

पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूकीतील प्रचार सभा कौठाळी, शिरडोण या ठिकाणी सौ.शैलाताई गोडसे यांनी आपली उमेदवारी ही जनतेच्या पाठबळावर…

4 years ago

बळीराजा परिवार व समविचारी आघाडीचा भगिरथ भालके यांना पाठिंबा

बळीराजा परिवार व समविचारी आघाडीचा श्री भगिरथ भालके यांना पाठिंबा मंगळवेढा:        श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना…

4 years ago

कल्याणराव काळे यांचा गुरूवारी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश

पंढरपूर प्रतिनिधी दि.06- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी अखेर भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी…

4 years ago

कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाल्याशिवाय मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार नाही – आ.रणजितसिंह मोहिते पाटील

कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाल्याशिवाय मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार नाही - आ.रणजितसिंह मोहिते पाटील   मंगळवेढा-   पंढरपूर-मंगळवेढा  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत येथील भारतीय जनता पार्टीचे…

4 years ago

सहकार शिरोमणीच्या सभासदांना गुढीपाडवा सणासाठी प्रत्येकी २५ किलो साखर वाटप

  सहकार शिरोमणीच्या सभासदांना गुढीपाडवा सणासाठी प्रत्येकी २५ किलो साखर वाटप. कारखाना साईट व पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचे शुभारंभ…

4 years ago

पत्रकारांच्या लसीकरणाबाबत तातडीने निर्णय घ्या

करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त प्रमाणात…

4 years ago

पक्षाने टाकलेली जबाबदारी आपल्याला सर्मथपणे पार पाडायची आहे-उमेश परिचारक

युटोपियन शुगरचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे नेते उमेश परिचारक यांनी पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातील भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार समाधान आवताडे…

4 years ago

शेतकऱ्यांची ऊस बिले,कामगारांचे पगार थकविणाऱ्या चेअरमनवर अंकुश ठेवण्यासाठी मला विधानसभेत पाठवा -शैला गोडसे

पंढरपूर.. मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीतील प्रचार सभा मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी,रहाटेवाडी, ताम दर्डी गावीआपल्या प्रचार सभेत बोलताना सौ.शैलाताई गोडसे यांनी आपले मनोगत…

4 years ago

महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा उद्योग – आ.प्रशांत परिचारक

२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री."समाधान महादेव आवताडे"…

4 years ago