पंढरपुर तालुक्यातील पोहरगाव येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे समजताच पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी केलेल्या कारवाईत डम्पिंग ट्रेलर व वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 1) महेश दादाराव पाटील व 2) आकाश भारत गायकवाड दोघे रा. पोहोरगाव ,ता पंढरपुर यांच्या विरोधात भादवि 379, 34 […]
Tag: #pandharpur
अन्न विभागाने कारवाई करूनही गुरुकृपा डेअरी चालक जुमानेना
अन्न विभागाकडून निर्धारित परवाना प्राप्त न करता पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील गुरुकृपा डेअरी चालकाकडून दुग्धजन्य व अन्न पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच सह.अन्न आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी १५ जुलै २०२१ रोजी कारवाई करीत सदर गुरुकृपा डेअरी हि आस्थापना बंद ठेवण्यास सांगितले होते.या कारवाईची पंढरपुर शहरात […]
मुंढेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर पोलीस उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या चारही पोलीस हद्दीतील भीमा नदीकाठच्या गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाच वाळू चोरी मात्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर तालुक्यातील विविध गावात आतापर्यत अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलिसांनी केलेल्या दिसून येतात.काही गावाच्या हद्दीत तर अवैध वाळू उपशावर पोलिसांकडून सातत्याने […]
पंढरपूर नगर पालिकेकडून लसीकरणासाठीच्या नोंदणी प्रक्रियेत बदल
पंढरपुर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, यापूर्वी नगरपरिषदेने लसीकरणच्या 4000 नोंदणी केली होती त्यामधील 3800 लोकांची यादी प्रसिद्ध करून लस देण्यात आली आहे उर्वरीत 200 जण यांना लवकरच यादी प्रसिद्ध करून लस देण्यात येईल सध्या लसीकरण केंद्रावर होत असले गर्दी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नगरपरिषदेने पुन्हा लसीकरण केंद्रावर नोंदणी करूनच लस देण्याचा निर्णय […]
भीमा नदी काठांवरील गावांनी सतर्क रहावे
भीमा-निरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने भीमा व नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे,असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेत पिकांची व सार्वजनीक मालमत्तेचे […]
आमची परत बातमी दिली तर तुला जिवे ठार मारू !
भीमा नदीकाठच्या अनेक गावात वाळू चोरांनी उच्छाद मांडला असून नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी करीत त्यांच्या शेतीतून वाट काढत अवैध वाळू उपसा करायचा,त्याच ठिकाणी साठा करायचा आणि शेतकऱ्याने विरोध केला तर त्याला दमदाटी करायची असे प्रकार सातत्याने होत असल्याची चर्चा आहे.अशातच पोलीस अथवा महसूलच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीच तर ज्या ठिकाणी वाळूचा साठा आढळून आला आहे त्या […]
पंढरपूर नगर पालिकेस यंदाही यात्रा न भरता ५ कोटी यात्रा अनुदानाचा धनादेश मिळाला
सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढपुरात येत असतात.भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेल्या भाविकांना कुठलीही समस्या जाणवू नये,या तिर्थक्षेत्राचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून राज्य शासन पंढरपूरला निधी उपलब्ध करून देणयाबाबत कायम झुकते माप देत आले आहे.तर २००८ साली तात्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी संत तुकाराम महाराज जन्म चतुशताब्दी निमित्त विशेष आराखडा मंजूर करत २४० […]
मानाच्या पालख्यांचे आगमन
आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन करत आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मानाच्या पालख्यांचे आगमन वाखरी पालखी तळावर झाले. वाखरी पालखी […]
एमएस-सीआयटी परीक्षेत आयआयटी मधील दोन सख्या बहिणी महाराष्ट्रात प्रथम
पंढरपूर: पंढरपूर शहरातील आयआयटी कॉम्पुटर सेंटर मधील तसमिया अतिक मुल्ला, अस्मिया अतिक मुल्ला व आकाश लोखंडे यांनी एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहे. मार्च 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये यश संपादन केल्या बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे संचालक नितीन आसबे यांनी त्यांचा […]
सरपंच पती आणि उपसरपंचाचा नंग्या तलवारी घेऊन बाभळगावात गोंधळ
इंदापूर तालुक्यातील बाभळगाव येथे गावातील मोकयाच्या असलेल्या दुकानगाळ्या चा वाद शिगेला पोहोचला असून या वादामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वादात थेट सरपंच पती व उपसरपंच यांच्यासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हरायल झाला आहे. गावातीलमोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे आम्हाला दे, नाहीतर तुला मारुन टाकीन असे म्हणत आरोपीने […]